कोकणाकडे मदतीचा ओघ सुरूच!शिवकार्य फाउंडेशन व संजुभाऊ घनवट युवा मंचची मदत कोकणाकडे रवाना!

कोकणाकडे मदतीचा ओघ सुरूच!शिवकार्य फाउंडेशन व संजुभाऊ घनवट युवा मंचची मदत कोकणाकडे रवाना!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

कोकणात झालेल्या अतीवृष्टीमुळे अनेक सामाजीक संस्थानी एक सामाजीक जबाबदारी म्हणुन मदतीचा हात कोकणवासीयांसाठी दिला.यामध्ये वाडा-कडूस गट तरी कसा मागे राहील.उपतालुका प्रमुख संजय घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट यांच्या आहवानाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी वाडा ते बहिरवाडी व वेताळे ते चांडोली या गावांमधील नागरिकांना संजूभाऊ घनवट युवा मंच व शिव कार्य फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यानी फक्त मदतीसाठी एक आवाज दिला व म्हणता म्हणता मदतीचा एवढा मोठा ओघ आला की पाचशे ते सहाशे कुटुंबाला तीन महिने पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेल एवढी मदत गोळा झाली.धान्य तेल किराना,पाणी या जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक खेड तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख संजयशेठ घनवट यांच्या उपस्थित रवाना झाले.मदत गोळा करण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली त्यांचे आभार संदिपशेठ घनवट यांनी मानले.यावेळी वाडा-कडूस गटातील गावचे सरपंच,उपसरपंच सदस्य व नागरिक उपस्थित होते.