कोतवालांच्या राज्यव्यापी संपास खेड तालुका कोतवाल संघटनेचा पाठींबा-अध्यक्ष सुनिल चव्हाण.

कोतवालांच्या राज्यव्यापी संपास खेड तालुका कोतवाल संघटनेचा पाठींबा-अध्यक्ष सुनिल चव्हाण.

खेड तालुका कोतवाल संघटनेकडून तहसीलदाराना निवेदन सादर.

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

राज्यव्यापी कोतवाल संघटनेकडून येत्या १५ ऑगस्ट पर्यंत कोतवालांच्या मागण्या मान्य न झाल्यास १६ ऑगस्ट पासून, राज्यात ठिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने केली जाणार असल्याने, त्याचाच एक भाग म्हणून, खेड तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन राज्यव्यापी संपाला खेड तालुक्याचा पूर्ण पाठींबा असल्याचे तालुका अध्यक्ष सुनिल चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणी देण्यात यावे, चतुर्थ श्रेणी मिळेपर्यंत वेतनातील अन्यायकारक भेदभाव दूर करून समान काम, समान वेतन या धर्तीवर राज्यातील कोतवालाना सरसकट १५,०००/- वेतन देण्यात यावा. कोतवाल संवर्गातील दि.०६/०२/२०१९ रोजी शासन निर्णयाबाबत पत्र क्र. ११२ई१० मार्गदर्शन पत्र रद्द करण्यात यावा.कोतवलांना तलाठी व तत्सम पदामध्ये ५०% आरक्षण देण्यात यावा. शिपाई संवर्गाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल संवर्गातून १००% पदोन्नती भरणेबाबत. कोरोना सारख्या महामारीत कोरोनाने मरण पावलेल्या कोतवालांच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांच्या वारसांना नियुक्ती करण्यात यावा. सेवानिवृत्ती नंतर कोतवालास कुठल्याही शासकीय लाभ मिळत नसल्याने सेवानिवृत्ती कोतवालास १० लक्ष रु एकरकमी निर्वास भत्ता देण्यात यावा.
अशा वरील विविध मागण्या संदर्भात राज्यव्यापी संप पुकारला जाणार असून, त्या संपास खेड तालुका कोतवाल संघटनेचा जाहीर पाठिंबा असून, त्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी, तालुका अध्यक्ष सुनिल चव्हाण, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, सचिव अजित रत्नपारखी,महिला अध्यक्षा विशाखा लोखंडे यासह सर्व कोतवाल बांधव उपस्थित होते.