कोरोणा च्या काळात ही बिरसा ब्रिगेड सह्याद्री व आदिवासी विचार मंच महाराष्ट्र ने कातकरी बांधवांना दिली जगण्याची छोटीशी उमिद*

*कोरोणा च्या काळात ही बिरसा ब्रिगेड सह्याद्री व आदिवासी विचार मंच महाराष्ट्र ने कातकरी बांधवांना दिली जगण्याची छोटीशी उमिद*

निवृत्ती नाईकरे पाटील(प्रतिनीधी-मु.पो.ग्रामीण)

कातकरी हातावर पोट भरणारी आदिवासी जमात ज्या दिवशी हाताला काम मिळेल त्या दिवशी घरातील पेटली जाते चुल कुठे वीटभट्टीमजूर म्हणून कातकरी बांधवांना मजुरी करावी लागते तर कुठे कुणाच्या शेतात सालगडी राहुन काम करावे लागते तशात जगभरात कोरोणाने घातलेल्या थैमानाने लाॅकडाऊन मुळे खेड तालुक्यातील विठ्ठल वाडी येथे आदिवासी कातकरी बांधव मोलमजुरी नसल्याने मेटाकुटीला आलेला आहे काम नाही तर चुल पेटणार कशी या द्विधा अवस्थेत सापडलेला असताना बिरसा ब्रिगेड सह्याद्री व आदिवासी विचार मंच महाराष्ट्र यांच्या वतीने मागील काही दिवसांपूर्वी तेहतीस कुंटुबाना व आज पंचवीस कुटुंबांना किराणा मालाचे किट व गहू व तांदूळ वाटप करण्यात आले.

या वेळी बिरसा ब्रिगेड सह्याद्री खेड तालुका अध्यक्ष एकनाथ भाऊ तळपे, सचिव लक्ष्मण मदगे सर ,कार्याध्यक्ष दिपक भाऊ गावडे,पुणे जिल्हा सचिव आकाश भाऊ लांघी, प्रविण मदगे व बिरसा ब्रिगेड सह्याद्री खेड तालुका पदाधिकारी उपस्थित होते