कोहिंडे बुद्रुक (ता.खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या १३ जागांसाठी ४४ अर्ज

कोहिंडे बुद्रुक (ता.खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या १३ जागांसाठी ४४ अर्ज

कडूस प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

कोहिंडे बुद्रुक (ता.खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या १३ जागांसाठी ४४ अर्ज दाखल झाल्याने गावचे राजकारण चांगलेच तापले असून गावपातळीवरील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कोहिंडे बुद्रुक संचालक मंडळाची निवडणूक येत्या २५ डिंसेबर रोजी होणार आहे.
सोसायटीचे ६३८ सभासद असून कोहिंडे बुद्रुक, रौधळवाडी, तळवडे, अशा दोन गावचा समावेश आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पहिल्याच सोसायटीची निवडणूक लागल्यामुळे मातब्बर नेत्यांनी राजकीय खेळी करत सोसायटीत शिरकाव करण्यासाठी वेगवेगळ्या गटात उभे ठाकले आहेत.
यातील कोणत्या नेत्यांना गटातील पँनल मध्ये प्रवेश मिळतो आणि कोणासाठी सोसायटीचे दरवाजे बंद होतात. अथवा सोसायटी बिनविरोध होऊन सोसायटीवर कोणाची सत्ता येते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
कोहिंडे बुद्रुक गावचे लोकनियुक्त सरपंच सुवर्णा कचाटे यांच्या जाऊबाई पुजा कचाटे, विद्यमान चेअरमन शिवाजी कचाटे, तळवडे गावचे माजी सरपंच रामदास शेलार, कोहिंडेचे माजी सरपंच संजय रौधळ, बार असोसियशनचे माजी अध्यक्ष संजय पानमंद यांच्या पत्नी पुनम पानमंद तर उद्योजक राजकुमार रौधळ, तानाजी कचाटे, लक्ष्मण कुटे, भिमाजी कचाटे, लक्ष्मण घोलप, अजित कुटे, गुलाब कंद, संजय रावजी रौधळ, ज्ञानेश्वर कुटे, कैलास कामठे, रोहिदास रणपिसे, माऊली कुटे, बाजीराव कुटे, विष्णू शिंदे, बबन मिंडे, काळूराम कंद, गुलाब कंद, योगेश देशमुख, सरस्वती कुटे, अलका शिंदे, मारुती वाळुंज,दत्तात्रय पिंगळे, बाबाजी जाधव, हिरामण कंद, अजित कुटे, भरत घोलप, सत्यवान कुटे, दत्तू पिंगळे, साहेबराव जाधव, मारुती रौधळ, सदाशिव कचाटेसुनील कुटे, रामदास पिंगळे, भिमाजी कंद, वसंत गोसावी आदी सह विविध उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने हे उमेदवार माघार घेतात की निवडणूक लढतात हे चित्र माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे.
बाजार समिती निवडणुका आधी सहकारी सोसायटीची निवडणुक होत असल्याने जो सोसायटीत निवडून जाईल त्याला बाजार समितीसाठी मतदानाचा हक्क प्राप्त होणार आहे. तसेच उमेदवारी देखील दाखल करता येणार आहे.
सद्या विद्यमान सोसायटी संचालकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाल्याने त्यांना आता सोसायटीत पुन्हा निवडून यावे लागणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत एक एक मत लाखमोलाचे असल्याने प्रथम सोसायटीत निवडून जाण्यासाठी गावपातळी वरील मातब्बर नेत्यांची कंबर कसली असून संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघात ८ जागा तर महिला २ , अनुजाती जमाती साठी १ इतर मागास वर्ययीय १, भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी १ आदी अशा जागा असून ४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

कोरोना लाँकडाऊनचा कालावधी पहाता सोसायटीच्या सभासद शेतकरी आज पाऊसाची वक्रदृष्टी, शेती मालाचे नुकसान, बाजारभाव गडगडल्याने अर्थिकद्रूष्ट्या पेचात असताना सोसायटीच्या माध्यमातुन उचलण्यात आलेले पिककर्ज काही शेतकऱ्यांना भरता आले नाही.
शेतकरी सभासद हे वयाने आणि अनुभवाने मोठे असताना. बिनविरोध निवडणुका घेऊन आपणच आपल्या सोसायटीची निवडणुक खर्चापोटी होणारी अर्थिक उधळपटी थांबवणे आजच्या काळात महत्वाचे असतानाच गावपातळीवरील ग्रामपंचायत असो अथवा सोसायटी निवडणुक असो भावकीमुळे प्रतिष्ठेची असते.