खासदार व आमदार यांच्या एकञीत प्रयत्नातून तीन तालुक्यातील जलसंधारणच्या कामासाठी ४ कोटी ६४ लक्ष ३३ हजार रूपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता- खासदार डाॅ.अमोल कोल्हे.

 • खासदार व आमदार यांच्या एकञीत प्रयत्नातून तीन तालुक्यातील जलसंधारणच्या कामासाठी ४ कोटी ६४ लक्ष ३३ हजार रूपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता- खासदार डाॅ.अमोल कोल्हे.
 • नारायणगाव – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या एकत्रित प्रयत्नांतून जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील गावांमधील सिमेंट व नाला बंधारे बांधण्यासाठी सुमारे रु. 4 कोटी 64 लक्ष 33 हजार रकमेच्या कामांना महाराष्ट्र जलसंधारण मंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

  शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सिमेंट व नाला बंधारे बांधण्याची मागणी जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील काही गावांमधून केली जात होती. मोठ्या धरणातील पाणी अडविण्याची मर्यादा संपल्यामुळे को.पं. अथवा लघुबंधारे बांधण्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. मात्र ० ते १०० हेक्टर क्षमतेच्या सिमेंट व वळण बंधाऱ्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याने अशा कामांना प्राधान्य दिल्यास गावांतील शेतीसाठीच्या पाण्याची समस्या सुटू शकते ही बाब लक्षात घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्याचे मृद् व जलसंधारण मंत्री श्री. शंकरराव गडाख यांच्याकडे सिमेंट नाला बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीचा कामगारमंत्री वळसे-पाटील, आमदार मोहिते पाटील आणि आमदार बेनके यांनी एकत्रितपणे पाठपुरावा केला होता.

  खासदार डॉ. कोल्हे व आमदारांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जुन्नर तालुक्यातील जांभुळशी (रु.२० लक्ष), कोपरे (रु. २० लक्ष ३० हजार), मांडवे (रु. २५ लक्ष ५७ हजार) आणि रानमळा (१६ लक्ष ३२ हजार) येथे सिमेंट बंधारे आणि घंगाळदरा (रु.१० लक्ष) येथील को.पं बंधारा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून एकूण *रु. १,२१,८९,०००* निधी मंजूर केला.

  मृद् व जलसंधारण मंत्री श्री. गडाख यांनी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील आमोंडी क्र.२ (१८ लक्ष ८५ हजार), चास, नारोडी (रु. ३७ लक्ष ३ हजार) व घोडेगाव पानमळा (रु.२९ लक्ष ५ हजार) येथील सिमेंट नाला बंधाऱ्यांसाठी एकूण *रु. ८४,९३,०००* इतका निधी मंजूर केला.

  त्याचबरोबर खेड तालुक्यातील गोसाशी शिववस्ती (रु. १५ लक्ष ९ हजार), कन्हेरसर पांढरी (रु. १७ लक्ष ७३ हजार), कान्हेवाडी क्र.१ ( रु. २९ लक्ष १० हजार), रानमळा कान्हेवाडी क्र.२ (रु. २० लक्ष ३७ हजार), रानमळा रेटवडी क्र.१ (रु. ३० लक्ष १४ हजार), रानमळा रेटवडी क्र.२ (रु. २१ लक्ष ७९ हजार), रानमळा सांडभोरवाडी क्र.१ (रु. २० लक्ष ७७ हजार), रानमळा सांडभोरवाडी क्र.२ (रु. २३ लक्ष २५ हजार), रानमळा वेताळे (रु. ५१ लक्ष २ हजार),
  रानमळा वरुडे (रु. २८ लक्ष २५ हजार)
  असा एकूण *रु. २,५७,५१,०००* इतका निधी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने मंजूर केला आहे. अशारितीने खासदार डॉ. कोल्हे आणि स्थानिक आमदारांनी समन्वयाने केलेल्या पाठपुराव्यामुळे *जुन्नर, आंबेगाव व खेड* या *तीन* तालुक्यातील गावांसाठी मिळून *एकूण रु. ४,६४,३३,०००* इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

  *स्थानिक आमदारांशी समन्वय राखून विकास करणार- डॉ. कोल्हे*
  रस्ते, पाणी, वीज आदी पायाभूत सुविधा म्हणजे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे अशी सातत्याने भूमिका मांडणाऱ्या खासदार डॉ. कोल्हे यांनी गावोगावच्या शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या कामांसाठी निधी मंजूर करण्यासाठी जातीने लक्ष घालून शेतीसाठीच्या पाण्याची समस्या सोडविल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर डॉ. कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्यापेक्षा त्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणं ही आपली प्राथमिकता असल्याचे सांगून कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार अशोक बापू पवार आणि आमदार दिलीप मोहिते पाटील आणि आपण समन्वयाने काम करुन लोकहिताची कामे मार्गी लावणार असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले.