खुनातील आरोपींचा पोलीसावर गोळीबार!कुरकुंडी ता.खेड येथील घटना!आरोपींना अटक!

खुनातील आरोपींचा पोलीसावर गोळीबार!कुरकुंडी ता.खेड येथील घटना!आरोपींना अटक!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

सांगवी, पिंपळे गुरव मधील काटेपुरम चौकात भर दिवसा एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना पकडायला गेलेल्या पिंपरी चिंचवडच्या पोलीस पथकावर आरोपींनी गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तर स्वक्षणार्थ पोलिसांनाही आरोपींच्या दिशेने फायरिंग केले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

या गुन्ह्यातील आरोपी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरकुंडी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ पोलिसांची चार पथके रवाना झाली.पोलिसांना पाहताच आरोपीनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यामध्ये एक पोलीस जखमी झाला. पोलिसांनी आरोपींच्या दिशेने फायरिंग केले.