खेडच्या आदिवासी भागात लवकरच कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत मा.प्रांत अधिकारी यांचे सकारात्मक आश्वासन

*किसान* *सभा* व *काँग्रेस* *पक्षाचे* *शिष्टमंडळ* यांची *राजगुरूनगर*  खेड तालुक्याचे *प्रांत* *अधिकारी* *यांच्यासोबत* *सकारात्मक* *चर्चा* …

  1. *राजगुरूनगर* * खेड तालुक्यातील* *आदिवासी* *भागात* *लवकरच* *कोविड* *केअर* *सेंटर* *सुरू* करण्याबाबत मा.प्रांत अधिकारी यांचे *सकारात्मक* *आश्वासन*

✍🏻 कोविड-१९ चा अटकाव करण्यासाठी किसान सभा,
राजगुरूनगर तालुका समितीने मा.उपविभागीय अधिकारी यांना शुक्रवार दिनांक ७ मे,2021 रोजी तालुक्यातील ग्रामीण,आदिवासी भागातील रुग्णांच्या आरोग्यासाठी व कोरोनासारखी महामारीच्या अटकावसाठी प्रशासनाने कृतिशील पाऊले उचलून कोरोनाचा वाढता प्रसार थांबवावा,याविषयी काही महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन दिले होते….

✍🏻 या निवेदनातील संघटनेने केलेल्या मागण्यांवर
मा. उपविभागीय अधिकारी श्री. विक्रम चव्हाण यांच्या सोबत किसान सभेचे पदाधिकारी,व कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यांनी दिनांक १० मे रोजी, सखोल व सकारात्मक चर्चा झाली..

✍🏻 या चर्चेवेळी मा.उपविभागीय अधिकारी यांनी संघटनेने केलेल्या, खालील मागण्यांवर दोन दिवसांत निर्णय घेऊन त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे….

*सकारात्मक* *निर्णय*

✊ राजगुरुनगर खेड तालुक्यातील,
आदिवासी भागातील कुडे, वाडा,पाईट व डेहन्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत दोन दिवसांत कोविड-१९ ची रॅपीड टेस्ट सुरू केली जाईल..

✊ तालुक्यातील आदिवासी भागात वाडा व पाईट या ठिकाणी कोविड सेंटर चालू करण्यासाठी दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल व शक्य झाल्यास ऑक्सिजन बेडची पूर्तता केली जाईल…

✍🏻 मा. उपविभागीय अधिकारी श्री.विक्रम चव्हाण यांच्या समवेत यावेळी चर्चा करण्यासाठी,
खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयभाऊ डोळस, किसानसभेचे अमोद गरुड, रज्जाकभाई शेख, विकास भाईक व संतोष बबनराव मदगे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.