खेडच्या पश्चिम भागातील रितेश शिर्के या युवकाला महाराष्ट्रातून इंडिया स्किल स्पर्धेत सुवर्णपदक.

खेडच्या पश्चिम भागातील रितेश शिर्के या युवकाला महाराष्ट्रातून इंडिया स्किल स्पर्धेत सुवर्णपदक.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो ग्रामीण

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील रितेश मारूती शिर्के या युवकाने इंडिया स्किल या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले असून,राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी रितेशची निवड झाल्याने खेड तालुक्याचे नाव आपल्या कौशल्यातून राष्ट्रीय पातळीवर सुद्धा उमटावणार आहे.

रितेश मारूती शिर्के हा युवक खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शिरगाव या गावचा असून,
मुंबई येथे झालेल्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कर्पोरेशन आयोजित इंडिया स्किल या स्पर्धा परीक्षेमध्ये  इंडस्ट्रिअल कंट्रोल या विभागातून महाराष्ट्र राज्यातून सुवर्ण पदक प्राप्त केले असून राष्ट्रीय पातळीसाठी रितेशची निवड झाली आहे.
खेड तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट असून,राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्या कौशल्यांचा ठसा उमटवणार आहे.पश्चिम भागातील जनतेकडून रितेशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.