खेडच्या पश्चिम भिमा खोर्‍यात मुसळधार पावसामुळे माती बंधारा फुटला,शेतीचे नुकसान.

खेडच्या पश्चिम भिमा खोर्‍यात मुसळधार पावसामुळे माती बंधारा फुटला,शेतीचे नुकसान.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण

खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसामुळे नायफड येथील माती बांध फुटून मोठे नुकसान झाले आहे तर भोरगिरी ते डेहणे या भागातील अनेक गावांमध्ये शेतीचे बांध वाहून गेले आहेत.यामुळे नुकत्याच आवणी केलेल्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले.दोन महिन्यापुर्वी झालेल्या चक्री वादळामुळे नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते.त्यातून सावरताच आता शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.या परिसरातील नुकसानीची पहाणी करून तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.