खेड तालुका काॅॅग्रेस लिगल सेल अध्यक्षपदी अॅड.महेश कोहिणकर.

खेड तालुका काॅॅग्रेस लिगल सेल अध्यक्षपदी अॅड.महेश कोहिणकर.
राजगुरूनगर
प्रतिनिधी-
खेड तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते श्री.सदाशिराव कोहिणकर यांचे सुपुत्र अॅड. महेश कोहिणकर यांची काँग्रेस लिगल सेल खेड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा काँग्रेस, लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी नियुक्तीचे पत्र दिले, त्यावेळी पुणे जिल्हा वकील ग्राहक सोसायटी संचालक अॅड. फैयाज शेख, ऍड गिरीश कोबल, रोकडोबा देवस्थानचे विश्वस्त अविनाश बहिरट,निशांत बारणे, हनुमंत अभंग इत्यादी उपस्थित होते.
एडवोकेट महेश कोहिनकर साहेब यांच्या नियुक्तीबद्दल राजगुरुनगर वकील संघटनेचे विद्यमान अध्यक्ष ॲड. संजय पानमंद, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अतुल उर्फ प्रदीप गोरडे, माजी अध्यक्ष ॲड.अरुण गोकुळ मुळूक, ॲड.सुभाष विठोबा कड पाटील,ॲड.बाळासाहेब महादेव लिंभोरे पाटील,ॲड.सुखदेवतात्या बबनराव पानसरे, ॲड.अतुल चंद्रकांत घुमटकर, ॲड.माणिकराव पाटोळे साहेब,ॲड.सुरेश कौदारे , ॲड.पोपटराव तांबे पाटील, ॲड.बी एम सांडभोर साहेब, ॲड.विक्रम प्रभाकर कड साहेब यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या