खेड तालुका तहसीलदार कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद- बजरंग दल, खेड प्रखंडा तर्फे हर्षच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन

खेड तालुका तहसीलदार कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद- बजरंग दल, खेड प्रखंडा तर्फे हर्षच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

खेड, राजगुरूनगर. दि- २४:
कर्नाटकात सर्व शालेय विद्यार्थ्यांना समान गणवेश अशी आग्रही भूमिका घेऊन, हिजाबला विरोध करणारी सोशल मीडिया पोस्ट टाकल्याने, कर्नाटकातील बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची शिमोगा येथे धर्मांध लोकांकडून निर्घृण हत्या झाली. ह्या विरोधात आज गुरुवार (दि २४) खेड तालुका तहसीलदार कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद- बजरंग दल, खेड प्रखंडा तर्फे हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करत निषेध नोंदविण्यात आला.
खेड येथील एस.टी. स्टँडच्या हुतात्मा राजगुरू स्मारकासापासून ह्या निषेध मोर्चाला सुरुवात झाली. ह्यावेळी यात शेकडो बजरंगिनीं, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सहभागी होत, हर्षच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली. पुढे तहसीलदार कार्यालयात गणेश रौन्धळ, गणेश मांजरे, स्वप्निल साळुंखे, विरेंद्र भागवत, अक्षय पऱ्हाड, आदेश शिंदे यांनी निवेदन दिले, त्यात हर्षच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची व देशभरात हिंदूंच्या होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली. अन्यथा बजरंग दल आपल्या पद्धतीने ह्या भ्याड धर्मांध हल्ल्यांना उत्तर देईल असा इशारा देण्यात आला.
निवेदन देण्यापूर्वी तहसीलदार कार्यालयासमोर प्रतिक दौंडकर यांनी कार्यकर्त्यांसमोर “कुणी वीट मारे, दगड हेच उत्तर. दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर. या उक्ती प्रमाणे जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा दिला.”
त्यासोबत adv.निलेश आंधळे यांनी “समान गणवेशापासून सुरू झालेला हा लढा, समान नागरी कायद्यापर्यंत सुरू राहील. तसेच उच्च न्यायालयाने शालेय सर्वांना समान राहील व हिजाब चालणार नाही ह्याबाबतच्या दिलेल्या निकालाचा पुनरुच्चार केला.”
तहसीलदार कार्यालयासमोरच हर्ष याला श्रद्धांजली वाहत निषेध मोर्चाचा समारोप झाला. ह्यावेळी योगीराज करवंदे, राजेश लांडे, दिपक गावडे, योगेश पवार, सागर खैरनार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.