खेड तालुका प्राथमिक शिक्षक, केंद्र प्रमुख सभा यांच्यावतीने सभापती मा.अरूण चौधरी ,माजी युवा सभापती मा.अंकुश राक्षे यांना निवेदन

खेड तालुका प्राथमिक शिक्षक, केंद्र प्रमुख सभा यांच्यावतीने सभापती मा.अरूण चौधरी ,माजी युवा सभापती मा.अंकुश राक्षे यांना निवेदन

राजगुरूनगर प्रतिनीधी
मु.पो.ग्रामीण.

खेड तालुका प्राथमिक शिक्षक, केंद्र प्रमुख सभा यांच्यावतीने सभापती मा.अरूण चौधरी ,माजी युवा सभापती मा.अंकुश राक्षे यांना निवेदन देण्यात आले.
१)शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये दुर्गम आणि सुगम हा भाग प्रस्तावित असलेल्या महामार्ग नुसार न लागू करता सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांनुसर ग्राह्य धरावा ,
२)मोबाईल रेंज ही शासन परिपत्रकात असलेल्या मोबाईल कंपनी नुसार लागू करावी
३) एकस्तर मध्ये वेतन संधर्भात प्रश्न मार्गी लागावा
४) २००४-२०१२ मधील शिक्षण विभागातील शिक्षकांची प्रलंबित देयक त्वरित मार्गी लावावी
५)आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम या वर्षी घेण्यात यावा
अश्या अनेक मग्ण्यांन बाबत चर्चा झाली व लवकरच या मध्ये सकारात्मक मार्ग काढू व सर्व पंचायत समिती सदस्य हे शिक्षकांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे आहेत असे आश्वासन देण्यात आले. व पुढील काळात खेड तालुक्यातील शैक्षणिक क्रांति वाढावी या साठी व्यापक योजना राबविणार असल्याचे सांगण्यात आले .