खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष व सेवा निवृत्त मुख्याध्यापक कै.शंकर महादु(शं.म)सांडभोर गुरुजी वय(87) वर्ष यांचे वृध्दपाकाळाने निधन.

खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष व सेवा निवृत्त मुख्याध्यापक कै.शंकर महादु(शं.म)सांडभोर गुरुजी वय(87) वर्ष यांचे वृध्दपाकाळाने निधन.

खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष व सेवा निवृत्त मुख्याध्यापक कै.शंकर महादु(शं.म)सांडभोर गुरुजी वय(87) वर्ष यांचे वृध्दपाकाळाने शनिवार दि.17/04/2021 रोजी पहाटे 3 वाजता निधन झाले.ते तालुक्यात शंकर मास्तर म्हणुन प्रसिधद होते.खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे हुतात्मा राजगुरु महाविद्यालय सुरु करण्यास व कॉलेज करिता सांडभोर कुटुबियांचे जागा देण्याकामी त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच पडाळवाडीतील शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळावे या कामी.1980 साली त्यांनी पुढाकार घेऊन राक्षेवाडी व पडाळवाडीतील शेतक-यासाठी पाणी योजना सुरु केली.तसेच पडाळवाडीतील अखंड हरिनाम सप्ताह सुरु केला.पडाळवाडीतील येसुबाई मंदीर व वाघोबा मंदीर उभारणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.पडाळवाडीतील कुठलेही सामजिक काम कराचे झाल्यास पहिला शंकर मास्तर यांचा सल्ला घेतला जात असे.त्याचे सामाजिक योगदान मोठे आहे शब्दात वर्णन करणे अवघड आहे.
पञकार बाळासाहेब सांडभोर यांचे ते वडील होते. त्यांच्या पाश्चात मुलगा,मुलगी,सुन.नातवंडे असा परिवार आहे.