खेड तालुका युवक काँग्रेस कडुन आंदोलनाचा इशारा

खेड तालुका युवक काँग्रेस कडुन आंदोलनाचा इशारा

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

भाम नदिच्या पुलाजवळ व रोहकल फाट्यावर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने स्पिड ब्रेकर टाकल्यामुळे व त्या शेजारी सुचणाफलक न लावल्यामुळे गाड्यांची एकमेकांना धडक बसुन अपघात होत अाहेत. या संदर्भात युवक काँग्रेसने NHAI चे प्रकल्प संचालक मा.संजय कदम यांना पत्र दिले तसेच हायवे समन्वयक मा .दिलीप मेदगे यांना व चाकण पोलिस स्टेशनला त्याची प्रत सुपुर्द केली .तसेच स्पिड ब्रेकर काढुन टाकावे किंवा सुचना फलक लावावेत अशी विनंती मा.संजय कदम यांना केली.
तसे न झाल्यास युवक काँग्रेस कडुन रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.अमोल दादा दौंडकर यांनी दिला आहे .
या प्रसंगी युवक काँग्रेसचे कार्यध्यक्ष ॲड.गणेश सहाणे , विजय कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.