खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील एकलहरे येथील बांगरवाडी डोंगराला भेगा.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील एकलहरे येथील बांगरवाडी डोंगराला भेगा.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

तीन दिवसापुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील एकलहरे येथील बांगरवाडी डोंगराला भेगा पडल्या असून,महसुल विभागातील कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून येथील तीन कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या सुचना दिल्या आहेत.येथील डोंगराला अतीवृष्टीमुळे अंदाजे २०० ते २५० फुट लांब भेग पडली असून,मंडलअधिकारी वाडा,तलाठी,ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देवून स्थळ पहाणी केली.व खबरदारीचा उपाय म्हणुन येथील तीन कुटुंबाना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सुचना दिल्या.