खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कङूस गावात पहिली वीज अटकाव यंत्रणेनेची उभारणी.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कङूस गावात पहिली वीज अटकाव यंत्रणेनेची उभारणी.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

कङूस (ता.खेड) खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कङूस गावात पाहिले वीज अटकाव यंत्रणेनेची उभारनी सरपंच निवृत्ती नेहेरे यांच्या हस्ते करण्यात आली.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कङूस ही मोठी बाजारपेठ असून सुमारे सतरा हजार लोक संख्या असलेल्या गावात पहिलेच वीज अटकाव यंत्रणा उभी केल्याने पावसाळ्यात पडणाऱ्या विजे पासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी फायदा होणार आहे. विज अटकाव यंत्रणेपासून सुमारे आठशे मिटर परिसरात पडणाऱ्या विजेचा अटकाव होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
कङूस आणि बारावाड्या वस्त्यावर विजेमुळे होणारी मनुष्य व वित्तहाणी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्यने महाराष्ट्र शासनाला ग्रामपंचायतीच्या मागणी नुसार खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कङूस गावात पहिले वीज अटकाव केंद्र उभारण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आहे.
यावेळी सरपंच निवृत्ती नेहेरे, उद्योजक प्रताप ढमाले, बाळासाहेब धायबर, आनंदराव पानमंद, विशाल ढमाले, नामदेव शेंडे, गणेश तिकोणे, शरद मापोटे, संजय गाढवे, प्रकाश शेटे, कैलास पिंगळे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.