खेड तालुक्यातील अग्रगण्य कडूस विवीध कार्यकारी सोसायटीकडून ४कोटी २३ लाख २० हजाराचे पहिल्या टप्यातील पिक कर्ज वाटप

  1. खेड तालुक्यातील अग्रगण्य कडूस विवीध कार्यकारी सोसायटीकडून ४कोटी २३ लाख २० हजाराचे पहिल्या टप्यातील पिक कर्ज वाटप

कङूस विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतिने सभासद शेतकऱ्यांना खरिप हंगामाचे ५२९ क्षेत्राला रू ४ कोटी २३ लाख २० हजार रुपयांचे खरिप हंगामाचे पहिले पिक कर्जाचे वाटप संस्थेचे अध्यक्ष पंडीत लक्ष्मण मोढवे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या २९०९ सभासदांन पैकी ७१३ सभासद शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
बँकेची १०० टक्के वसूल होऊन संस्था पातळीवर ८५ टक्के झाली आहे. संस्थेला २५ लाख रुपयांचा नफा झाला होता. शेतकरी सभासदांना १० टक्के लाभांशचे वाटप करण्यात आले होते. तर रब्बी हंगामा मध्ये १०१३ सभासदांना ५.४५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते.
सद्या कोरोनाच्या महामारी बरोबरच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच खरिप हंगाम एक महिन्यावर आला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ भांडवल उपलब्ध व्हावे ही परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना सोसायटीच्या वतिने खरिप हंगामाचे पिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
खरिप हंगामात बटाटा, भात, स्वायाबीन, मका आदी सह विविध पिके घेत असतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी काही वेळेस अडचणी येत असतात. यामुळे  बहुतांशी शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन खरिप आणि रब्बी हंगामाचे नियोजन करून पिके घेत असतात. त्यातच अतिपावसाने वाया गेलेला हंगाम खरिप पिकांनी भरून काढण्यासाठी सोसायटी कडे अधिक शेतकरी वळू लागले असल्याचे अध्यक्ष पंडीत मोढवे यांनी सांगितले.
यावेळी विभागीय अधिकारी विलास भास्कर, सरपंच निवृत्ती नेहेरे, संचालक अशोक गारगोटे, बाजीराव शिंदे, सुदाम ढमाले, विकास आधिकारी मुरलीधर ढोरे, सचिव तात्यासाहेब कल्हाटकर, मँनेजर रघुनाथ मुळूक, बाळासाहेब धायबर, नामदेव गारगोटे, कोडिभाऊ गारगोटे, अमोल धायबर, शंकर ठोंबरे, आदी सह सभासद शेतकरी सेवक उपस्थित होते.
कङूस सोसायटीचे व संस्थेचे अध्यक्ष पंडित मोढवे यांचे उत्कृष्ट काम असून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर विविध पुरस्कार मिळाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात तालुकास्तरीय कायमस्वरुपी ढाल देऊन संस्थेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २०१७ मध्ये सोसायटीस माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार सहकार गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.