खेड तालुक्यातील कळमोडी गावचे रांगोळीकार महादेव गोपाळे यांची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

खेड तालुक्यातील कळमोडी गावचे रांगोळीकार महादेव गोपाळे यांची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

वाडा प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे सर यांचा सहभाग
खेड तालुक्यातील कळमोडी गावचे रांगोळीकार महादेव गोपाळे यांची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे.
इंदोर येथील रडार संस्थेमार्फत लाँकडाऊन मधिल कोरोना महामारी च्या काळात सुट्टीचा सदुपयोग व्हावा म्हणून पूर्ण जगातील 112 देशामधिल नामवंत कलाकारांना फेसबुक च्या माध्यमातून एकत्रित करुन एकूण 1149 चित्र (पेटिंग) साकारले. त्यात 797 चित्रे एका तासात फेसबुकवर अपलोड करावयाचे होते .त्यात मुंबई येथिल कलाशिक्षक श्री. मनोहर बाविस्कर सर व प्रसिद्ध रांगोळीकार सन्माननीय श्री महादेव गोपाळे सर यांनी सहभाग नोंदविण्यात आला. जगातील 112 देशाचां व देशातील 26 राज्याच्यां
कलावंताचा यात सहभाग होता. यात आपल्या चित्रांचा सहभाग गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. हा मुंबई सह महाराष्ट्राचा गौरव आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कडून बहुप्रतीक्षित सहभाग प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदक मिळाले