खेड तालुक्यातील बाल गिर्यारोहक वरदराजे निंबाळकर याचा खेड शिक्षण विभागाकडून सन्मान

खेड तालुक्यातील बाल गिर्यारोहक वरदराजे निंबाळकर याचा खेड शिक्षण विभागाकडून सन्मान

राजगुरूनग प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

खेड तालुक्याचे आदरणीय शिक्षकप्रिय गटशिक्षणाधिकारी श्री.संजय नाईकडे साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कोकणे साहेब व कळमकर साहेब यांनी बाल गिर्यारोहक वरदराजे निंबाळकर यास वजीर सुळका सर केलेल्या कामगिरीबद्दल कार्यालयात बोलावून त्याचे कौतुक केले , अभिनंदन केले.तसेच भावी उज्ज्वल कामगिरी साठी शुभेच्छा दिल्या.

अशा बाल गिर्यारोहकांमधूनच उद्या भारताला ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळू शकते अशा भावना माननीय गटशिक्षणाधिकारी नाईकडे साहेब यांनी व्यक्त केल्या

उच्च ध्येय आणि कष्ट करणारेच आयुष्यात यशस्वी होतात वरद देखील देशासाठी नेतृत्व करेल असा विश्वास फ्रेंडशिप 92चे प्रवक्ते प्रविण सुतार यांनी व्यक्त केला फ्रेंडशिप 92 राजगुरूनगर यांनी देखील कौतुक केले

खेड तालुकाशिक्षक पतसंस्थेचे मा.सभापती श्री.अविनाश शिंदे, संजय घुमटकर आदर्श मुख्याध्यापक सुरेशराव नाईकरे. गिरिभ्रमर ग्रुपचे संस्थापक दत्तात्रय बोडरे याप्रसंगी उपस्थित होते.

महाराष्ट्राला वरदान लाभलेल्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अनेक गडकोट व पर्वतीय सुळके आहेत यामध्ये प्रामुख्याने लिंगाणा ,अलंग-मदन-कुलंग, वानरलिंगी सुळका, तैलबैला व बुद्धिबळातील वजीरा सारखा दिसणारा वजीर सुळका हा नेहमीच भटक्या पर्यटकांना खुणवत असतो.
या सुळक्याची उंची साधारण 200 फुटाच्या आसपास असून हा समुद्रसपाटीपासून साधारणपणे दोन हजार आठशे फूट उंचीवर आहे त्याचे भौगोलिक स्थान हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली किल्ल्यालगत आहे .
हा सुळका चढाईसाठी काठिण्यपातळी मुळे गिर्यारोहकांसाठी नेहमीच आकर्षित करतो

रविवार दिनांक 9 जानेवारी 2022 या दिवशी कडूस ,ता खेड येथील अकरा वर्षीय गिर्यारोहक वरदराजे निंबाळकर याने अगदी लिलया अतिकठीण असा वजीर सुळका सर केला याची महाराष्ट्रात चर्चा आहे.

एस एल ॲडव्हेंचर चे श्री लहू उघडे इतर आठ सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गिरी भ्रमर ग्रुप राजगुरुनगर व शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठान, शिरूर या पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांनी देखील रविवार दिनांक 9 जानेवारी 2022 या दिवशी यशस्वीपणे चढाई केली .