खेड तालुक्यातील राजकारणात नक्की चाललय काय?स्वकीयांचेच बंड!त्याला इतरांचा पाठिंबा!

खेड तालुक्यातील राजकारणात नक्की चाललय काय?स्वकीयांचेच बंड!त्याला इतरांचा पाठिंबा!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

गेली दोन महिन्यापुर्वी सुरू झालेल्या अविश्वासाच्या खेळाला आता पुन्हा एकदा नवीन संस्थेचा नवीन खेळाने सुरूवात झाली आहे.तो पण नेमका कालावधी संपत असतानाच का?यामुळे तालुक्यातील राजकारणाला नक्की कोणती कलाटणी भेटणार हे पहाणे रंगतदार ठरणार आहे.तालुक्यातील जनतेसाठी या दोनही संस्था महत्वाच्या आहेत.एका संस्थेतील प्रतिनिधी जनतेतून निवडून येतात तर दुसर्‍या संस्थेतील प्रतिनिधी हे शेतकरी निवडून देतात.जनता काय आणी शेतकरी काय शेवटी एकच ना? अविश्वासाचा ठराव आणला काय आणी सह्यांचे अधिकार काढून घेतले काय!मार्ग जरी वेगवेगळे असले तरी उद्देश एकच आहे!पण भविष्यकाळात याचे पडसाद वेगळेच उमटणार हे नक्की!आणी ज्या मतदारांच्या जीवावर आपण निवडून आले आहात!त्यांना काही कळत नाही असे समजू नका.