खेड तालुक्यातील लोकप्रिय नेते शांताराम भोसले भाजपत दाखल.

खेड तालुक्यातील लोकप्रिय नेते शांताराम भोसले भाजपत दाखल.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

खेड तालुक्यातील प्रत्येक गावात ओळख असणारा नेता म्हणजे शांताराम भोसले.दहा वर्षे राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष असताना पक्ष संघटना वाढवण्यास मोलाचा वाटा उचलला.या काळात त्यांनी गावन गाव पिंजून काढली.दिलदार स्वभावामुळे ते ज्या गावात जातील तेथे त्यांनी गावातील नागरिकामध्ये आपुलकी निर्माण केली.त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्यामुळे याचा फायदा भारतीय जनता पक्षाला नक्कीच होणार आहे.

खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर रामराम करीत माजी तालुकाध्यक्ष शांताराम भोसले भाजपात दाखल झालेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांना सलग दहा वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत यश मिळाले होते. मात्र, त्यांना पदावरून हटविल्यानंतर खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपयशाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता भाजपाने नव्याने राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. बेरजेच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे माजी तालुकाध्यक्ष शांताराम भोसलेंना भाजपने दार उघडे केले आहे. भाजपची ही नवी खेळी किती प्रभावी ठरते हे काळच ठरवेल.

विधानसभा निवडणुकीत भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभावाचा सामना करावा लागला. मात्र, येणारी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना सूक्ष्म नियोजन करीत पक्ष प्रवेशाचे गणित मांडायला भाजपाने सुरूवात केली आहे. भोसले यांचा पक्षप्रवेश हे त्याचेच द्योतक असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

पुणे येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भोसले यांना पक्षप्रवेश देण्यात आला. यावेळी माजी मंत्री संजय बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख उपस्थित होते.