खेड तालुक्यातील शिक्षक श्री. रविंद्र बुरसे यांचा नेपाळ येथे सन्मान

खेड तालुक्यातील शिक्षक श्री. रविंद्र बुरसे यांचा नेपाळ येथे सन्मान

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

दिनांक 1नोव्हेंबर 2022 रोजी नेपाळ मधील काठमांडू या ठिकाणी संपन्न झालेल्या नेपाळ-भारत हिंदी शिक्षक एवं साहित्यकार संमेलनात मूळचे बुरसेवाडी ता.खेड येथील असलेले व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आढळगाव ता-श्रीगोंदा येथे कार्यरत असलेले शिक्षक श्री.रविंद्र सावळेराम बुरसे यांना ‘आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण’पुरस्काराने गौरविण्यात आले.
अमेरिकन दूतावसातील नेपाळचे सांस्कृतिक सचिव तथा प्रसिद्ध आधुनिक नेपाळी हिंदी साहित्यीक डॉ.तुलसी दिवस यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रसंगी आसावरी बापट( निर्देशक,स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र भारतीय दूतावास नेपाळ)
डॉ.मंचला झा (नेपाळ टी.आर.सी माजी आयुक्त ,त्रिभुवन युनिव्हर्सिटी व्याख्यात्या),डॉ.राजेश कुमार (डी.आर.डी.ओ वैज्ञानिक) ओम प्रकाशजी (बाल साहित्यिक व संपादक) ,संयोजन प्रमुख श्री कैलास जाधव,केंद्रीय समन्वयक श्री उस्मान मुलानी ,सहाय्यक समन्वयक श्री योगेश दरेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

24 फेब्रुवारी 2021 मध्ये गोवा येथे झालेल्या राज्यस्तरीय हिंदी संमेलनात त्यांना भाषारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते व आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळण्यामुळे सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारतातील 70 व नेपाळमधील 10 शिक्षकांना या संमेलनात आंतरराष्ट्रीय भाषाभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.