खेड तालुक्यात पुढचा आमदार शिवसेनेचा असेल-खासदार संजय राऊत

खेड तालुक्यात पुढचा आमदार शिवसेनेचा असेल-खासदार संजय राऊत

राजगुरूनगर प्रतिनीधी
मु.पो.ग्रामीण

राजगुरूनगर येथे आयोजीत पञकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊत यांनी विदयमान आमदार यांच्या कार्यपद्धतीवर टिका केली.ते म्हणाले की पंचायत समितीचा विषय हा आमच्यासाठी आम्ही प्रतिष्ठेचा केला आहे.आम्हालाही माणसे फोडता येता.आम्ही ही फोडू शकतो.आघाडीमुळे आपण एका नियमाने तस वागल पाहीजे.बाळासाहेबाइतकी श्रद्धा शरद पवार यांच्यावर पण आहे.पुढे आघाडी असेल किंवा नसेल येथे विदयमान आमदार माजी असतील व शिवसेनेचा आमदार निवडून येईल.राजकारणातील सहकारी दिवंगत नेते सुरेशभाऊ गोरे प्रंचड मतानी निवडून आले होते.त्यांच्या काळात हे काम मंजूर झाले.गोरे यांची भावनिकता यात गुंतली आहे.लोकांचा पण आग्रह आहे हे काम इथेच झाले पाहीजे.विदयमान आमदारांना जर एवढी माणुसकी नसेल तर ते शरद पवार यांच्या पक्षात राहायच्या लायकीचे नाहीत.अजीतदादांनी सांगीतले.मुख्यमंञी यांनी सांगीतले.तरी हे महाशय ऐकत नसेल तर यांना काय म्हणायच.खेड येथे जो परवा प्रकार झाला.पंचायत समितीच्या सदस्यांना पैशाच्या व दमदाटीच्या जोरावर पळवून नेले हे आघाडीच्या कोणत्या नियमात बसत.