खेड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राष्ट्रवादी काॅग्रेंसच्या सौ.वैशाली संतोष गव्हाणे यांची बिनविरोध निवड!

खेड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राष्ट्रवादी काॅग्रेंसच्या सौ.वैशाली संतोष गव्हाणे यांची बिनविरोध निवड!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

खेड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सौ.वैशाली संतोष गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सौ.वैशाली संतोष गव्हाणे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सभापती मा.अरुण चौधरी यांनी सही केली.
यावेळी माजी युवा सभापती अंकुश राक्षे ,सौ. नंदाताई सुकाळे व सौ.सुनीता ताई सांडभोर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काॅग्रेंस पक्षाची कमी सदस्य संख्या असताना सुद्धा शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे सभापती उपसभापती करून आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्यातील आपले वर्चस्व सिद्ध केले असून,येणार्‍या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी खेड तालुक्यात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षासाठी जमेची बाजू ठरणार आहे.