खेड पंचायत समितीच्या सभापतींचा स्वताच्या पक्षातील सदस्यांवर जीवघेणा हल्ला.

  1. खेड पंचायत समितीच्या सभापतींचा स्वताच्या पक्षातील सदस्यांवर जीवघेणा हल्ला.
    राजगुरूनगर प्रतिनीधी-

खेड तालुका पंचायत समितीचे  विद्यमान सभापती यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक  घटना घडली आहे.

पुण्यातील डोणजे गाव परिसरातील डोंगरावरील एका खासगी रेसॉर्ट हा जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे. सभापती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाली आहेत. या हल्ल्यात दोनजन गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणूकिवरून हा वाद झाल्याची माहिती समोर येते आहे. विदयमान सभापती यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्या नंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते. म्हणून  समितीच्या सदस्य असलेल्या एक महिला सदस्यांनी इतर सहा सदस्यांसोबत मिळून सभापती विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला,
त्या ठरावाच्या बाजूने येत्या ३१ तारखेला मतदान होणार होतं त्यामुळे ठराव मांडणारे सर्व सदस्य एका खासगी रिसॉर्ट मध्ये थांबले होते. मात्र ही माहिती सभापती यांना मिळाली आणि त्यांनी रात्री आपला भाऊ आणि कार्यकर्त्यां सोबत येऊन आमच्यावर जीवघेणा हल्ला केलाअसून,तक्रार दाखल करण्यात आली आहे.