खेड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काॅग्रेसचे अरूण चौधरी यांची बिनविरोध निवड.

खेड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काॅग्रेसचे अरूण चौधरी यांची बिनविरोध निवड.

राजगुरूनर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

खेड तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. तर शिवसेनेचे विदयमान सभापती भगवान पोखरकर यांचा अर्ज बाद झाला आहे.सभापती पदासाठी खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत सभापती पदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते.शिवसेनेच्या वतीने भगवान पोखरकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना पंचायत समिती सदस्य ज्योती अरगडे यांनी अनुमोदक म्हणून त्यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गटनेते अरुण चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता.त्यांच्या उमेदवारी अर्जावर पंचायत समिती सदस्य वैशाली गव्हाणे यांनी सही केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेचे भगवान पोखरकर यांचा उमेदवार अर्ज बाद झाला आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय
तथा उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.