खेड मध्ये टिका आणी मंचर मध्ये प्रिय!यालाच राजकारण म्हणतात ना भाऊ!

खेड मध्ये टिका आणी मंचर मध्ये प्रिय!यालाच राजकारण म्हणतात ना भाऊ!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

खेड पंचायत समितीच्या सत्ताबदलावरून दि.४ रोजी शिवसेना मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टिका केली होती.पण दुसर्‍याच दिवशी दि.५ रोजी मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पुर्णाकृती पुतळा आनावरण प्रसंगी राष्ट्रीय नेते शरदराव पवार यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खासदार व सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आपल्या भाषणात “आमचे प्रिय आमदार दिलीप मोहिते असा उल्लेख केला” आणी उपस्थितांचा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनाही हसू आवरले नाही.
म्हणतात ना राजकारणात कोण कोणाचा कायमस्वरूपी शञु नसतो.या वाक्याचा प्रत्यय या व्यासपिठावर आला.