गटशिक्षणाअधिकारी संजय नाईकडे यांच्याकडून नुकसानग्रस्त शाळांची पहाणी

गटशिक्षणाअधिकारी संजय नाईकडे यांच्याकडून नुकसानग्रस्त शाळांची पहाणी

निवृत्ती नाईकरे पाटील
चासकमान प्रतिनीधी

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात रविवार दि.१७ रोजी वादळी वार्‍यामुळे भोरगिरी व भिवेगाव परिसरात शाळांची छते ऊडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले असून,या शाळांची पहाणी गटशिक्षणाअधिकारी संजय नाईकडे यांनी केली.
जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे व प्रांताधिकारी विक्रम चव्हाण यांच्यासमवेत नाईकडे यांनी नुकसानग्रस्त शाळांची पहाणी केली.या शाळांची दुरूस्तीसाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार असून,प्रशासनाला अहवाल सादर करून,दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करणार असल्याचे नाईकडे यांनी सांगीतले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायकशेठ घुमटकर ,मा.उपसभापती विठ्ठलशेठ वनघरे,जिल्हा परिषदेचे मा.सभापती अरुणशेठ चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महिला विभाग अध्यक्ष सुजाताताई पचपिंड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुखदेव तात्या पानसरे, कान्हेवाडी बु.शाळेचे मुख्याध्यापक सुरेश नाईकरे,सामाजीक कार्यकर्ते किरण वाळुंज उपस्थित होते.