गुंडाळवाडी गावचा पाणीपुरवठा वीस वर्षानंतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या प्रयत्नातून चालू

  • गुंडाळवाडी गावचा पाणीपुरवठा वीस वर्षानंतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या प्रयत्नातून चालू
    वाडा दि. १९  प्रतिनिधी आदेश भोजने
    बिबी ग्रामपंचायतिच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका आणि त्यामधून निवडले गेलेले नवीन ग्रामपंचायतचे सरपंच सौ सुजाता सागर भोर आणि उपसरपंच श्री सतीश जैद  यांनी निवडणुकीच्या काळात ग्रामस्थ मतदार याना दिलेली आश्वसने विसरून न जाता त्यांची पूर्तता करण्या साठी कंबर कसली आहे.
    बिबी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गुंडाळवाडी येथील बेंगडेवस्ती व जैद वस्तीवर पिण्याच्या पाण्याची बरीच वर्षे सोय नव्हती. वस्ती वरील महिलांना एक किलोमीटर दूर विहिरीवर पाण्या साठी जावे लागत होते. गेले दहा वर्षापूर्वी केलेली पाण्याची लाईन बंद अवस्थेत होती. साध्य ग्रामीण भगात उन्हाळा तीव्र झाला असून पानी टंचाई ने डोके वर काढले आहे. यातच निर्वार्चित सरपंच व उपसरपंच यानी  वचनपूर्ती करायचीच या हेतूने उपसरपंच सतीश जैद आणि सदस्य अरुण गुंडाळ यांनी ग्रामस्थांना श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. त्याला उस्फुर्त प्रतिसाद देत ग्रामस्थांनी हि पुढाकार घेतला. त्यात विशेषतः संतोष डोंगरे, बसवराज तेली यांनी पुढाकार घेतला आणि अनेक वर्ष बंद पडलेली जुनी पाण्याची लाईन उकरून काढली जिथे जिथे पाईप फुटलेले होते ते पुन्हा जोडून घेतले आणि त्या लाईन ला गावातील मुख्य पाईप लाईनशी जोडून घेवुन ग्रामपंचायत फंडाची वाट न बघता सरपंच, उपसरपंच,  सदस्य आणि ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून काम मार्गी लावले. भर उन्हाळ्यात वस्तीवर पाणी पोहचल्याने वस्ती वरील महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपले मत सत्कारणी लागल्याची भावना ग्रामस्थ कडून सांगितले गेले. पाणी पूजन करण्यासाठी सरपंच सौ सुजाता सागर भोर उपसरपंच सतीश जैद सदस्य अरुण अण्णा गुंडाळ, फसाबाई चतुर, दीपक कालेकर, पोलीस पाटील संतोष भोर, शिवसेनेचे शाखाप्रमुख बाळासाहेब जैद, ग्रामसेवक कल्याणी राजगुरू आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
    उपसरपंच सतीश जैद यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाळवाडी ग्रामस्थानी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याचा निर्धार केला असून त्या प्रमाणे प्रत्येक रविवारी आणि बुधवारी गावातून ओला आणि सुखा कचरा वेगळा वेगळा गोळा करून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताचा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. त्यास ही ग्रामस्थांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. असे छोटे छोटे परंतु लोकपयोगी उपक्रम लोक सहभागातून राबविण्यास सुरवात केल्याने नवनिर्वाचित सरपंच, उप सरपंच, सदस्य यांचे ग्रामस्थ कौतुक करत आहेत असे अरुण अण्णां गुंडाळ यांनी सांगितले.