ग्रामीण भागातील डेहणे आरोग्य केंद्रात सर्प दंश प्रतिबंधक लस उपलब्ध करा.

ग्रामीण भागातील डेहणे आरोग्य केंद्रात सर्प दंश प्रतिबंधक लस उपलब्ध करा.

निवृत्ती नाईकरे पाटील मु.पो.ग्रामीण.

पावसाळा सुरू झाल्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकरी व शेतीवरील आधारित असणारे शेती पूरक व्यवसाय करत असता वेळेस खेड्यापाड्यात शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर तसेच ठाकर, कातकरी या समाज्याच्या लोकांना आपले कुटुंब चालवण्यासाठी भर पावसात, रानात व गवतात वणवण फिरून सरपण गोळा करणे, खेकडे पकडणे, रानभाज्या गोळा करणे. तसेच रानात गुरे चारने अश्या प्रकारची कामे नित्यनेमाने करावी लागतात. व ही नेहमीची कामे करत असताना त्यांना सर्प दंश सारख्या घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यातच तत्काळ उपचार न मिळाल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.

याची खबरदारी म्हणून डेहणे येथील आरोग्य केंद्रात सर्प दंश वरील प्रतिबंधक लस उपलब्ध करण्यात यावी. यामुळे रूग्णाला तत्काळ उपचार मिळून त्यांचा जीव वाचेल यासाठी आज खेड तालुका राष्ट्रीय मानव अधिकार *अध्यक्ष पै.शरदभाऊ जठार,* *उपाध्यक्ष श्री. सुनिलभाऊ मिलखे * *ग्रामपंचायत सदस्य श्री. रोहिदास भाईक* यांनी *डेहणे* येथील आरोग्य कर्मचारी यांना निवेदन दिले 🙏