घनकचरा व्यवस्थापक प्रकल्प करण्यास आगरमाथा ग्रामस्थांचा तिव्र विरोध.

घनकचरा व्यवस्थापक प्रकल्प करण्यास आगरमाथा ग्रामस्थांचा तिव्र विरोध.

कडूस प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

आगरमाथा (ता.खेड) येथिल रस्त्याच्या लगत असलेल्या गायरानात घनकचरा व्यवस्थापक प्रकल्पा करण्यास आगरमाथा ग्रामस्थांनी तिव्र विरोध केला असून शुक्रवारी ग्रामपंचायवर मोर्चा काढणार असल्याने कचरा प्रश्न पेटणार आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचणा अधिनियम १९६६ चे कलम २६/१ अन्वये पुणे महानगर प्रदेश विकास योजनेतील तरतुदींला ग्रामस्थांनी हरकत घातली आहे.
पुणे महानगर प्रदेशाची प्रारूप विकास योजना महाराष्ट्र शासनामार्फत दि. ३० जुलै २०२१ रोजी राजपत्राने प्रसिद्घ झाली आहे. पुणे महानगर विकास योजनेचे नकाशे देखील प्राधिकारनामार्फत उपलब्ध करुन देन्यात आले असुन शासनामार्फत प्रारुप योजनेतील तरतुदींसंदर्भात नागरीकांच्या सुचना, हरकती महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्घ झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत लेखी स्वरूपांत करण्याबाबत शासना कडून कळविण्यात आले आहे.
पुणे महानगर विकास योजनेचे नकाशे व गावांची यादी नुसार देखील प्राधिकारनामार्फत उपलब्ध करुन देन्यात आली आहे त्याप्रमाने कडूस गावाचा समावेश ग्रामिण विकास सुची मध्ये करण्यात आला आहे. प्राधिकारना मार्फत उपलब्ध करुन देन्यात आलेल्या नकाशा प्रमाणे कडूस (आगरमाथा) येथिल मिळकत गट नं. १५७८ ही गायरान मिळकत खेड-कडूस मुख्य रस्त्याला असताना ती घन कचरा नियोजन प्रकल्पाकरीता (SWM) प्रस्तावित म्हनून दाखविली आहे.
ही जागा कङूस राजगुरूनगर रस्त्याच्या लगत असून परिसरात सुमारे ७०० लोकांची मोठी लोक वस्ती आहे. या परिसरात कानिफनाथ मंदिर, कोळीबा मंदिर असून परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. तसेच शंभर मिटर अंतरावर जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा आगरवाडी आहे. या शाळेत आगरवाडीतील पहिली ते पाचवी पर्यतचे शालेश विद्यार्थी शिक्षण घेत आहे या विद्यार्थीच्या आरोग्या प्रश्न निर्माण होणार आहे.
शासनाने परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविल्यास भविष्यात परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरून साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
परिसरातील शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची शेती धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनाने दिलेल्या सुचानेप्रमाणे शासन निर्णय झाल्या पासून ३० दिवसांच्या आत हरकती मागविल्या असल्याने हा निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामपंचायतीचा असल्यामुळे या मिळकतीच्या रुपात नकाशा प्रमाणे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात यावा अन्यथा शुक्रवारी ग्रामपंचायवर तिव्र मोर्चा काढणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
सदर गट खेड- कङूस रस्त्याच्या अगदी लगत लोकवस्ती असल्याने कचरा प्रकल्प करण्यास तिव्र विरोध कायद्याचा आधार घेऊन हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद पाडणार आहे. या गायरानात गार्डन खेळाचे मैदान, बहुउपयोगी मैदान, धार्मिक स्थळ, इतर सामाजिक प्रकल्पा करिता योग्य आहे असे अँड सुजय जाधव यांनी सांगितले.