घर असो अथवा गाव स्वच्छता महत्वाची!आपला गाव स्वच्छ ठेवणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी!-जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट
निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.
घर असो अथवा गाव स्वच्छता महत्वाची आहे.घराचा परिसर कसा आहे यावरुन जसे घराचे रूप कळते तसेच गावाचा परिसर कसा आहे यावरून गाव कसे आहे कळते.गाव स्वच्छ ठेवणे गावातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.असे मत जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांनी कडूस ता.खेड येथे ग्रामपंचायतला ओझोन घंटा गाडी लोकार्पण कार्यक्रमावेळी व्यक्त केले.
कङूस(ता.खेड) येथे शिवसेना उपतालुका प्रमुख संजय घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा- कङूस जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तनुजा घनवट यांच्या सौजन्याने केंद्र पुरस्कृत १५ वा वित्त आयोग जि.प स्तर २०-२१ मधून कङूस ग्रामपंचायतला ओझोन घंटा गाडी देण्यात आली. तिचे लोकार्पण नुकतेच घनवट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण शिंदे, गणेश मंडलिक, सुधाताई पानमंद, किसन नेहेरे, गजानन धायबर, चांगदेव ढमाले, बाळासाहेब ढमाले, शामराव ढमाले, प्रकाश कालेकर, अंजिराम नेहेरे, अनिल जाधव, विश्वास नेहेरे, अरुण अरगडे, शंकर डांगले, शारदा कदम, अमोल ढमाले, बाळासाहेब माने, नवनाथ गारगोटे, दत्तात्रेय गुंजाळ, राजाराम ढमाले, आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.