घर  व परिसर झाडांनी भरलेला राहण्यासाठी प्रयत्न करा.

घर  व परिसर झाडांनी भरलेला राहण्यासाठी प्रयत्न करा.
चिखलगाव (ता.खेड) येथील ह.भ.प. वै. रखमाजी बाबा गोपाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावाच्या स्मशानभूमीमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमानिमित्त निसर्गाचा वाढत चाललेला समतोल व वाढते तापमान या साठी मनुष्य प्राण्यास पर्यावरण संतुलनाची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि आज जगाच्या पाठीवर तोडली जाणारी जंगले आणि उभे रहणारी सिमेंटच्या जंगलाने वातावरण पूर्णपणे दूषित व प्रदूषित झालेले आहे. त्यासाठी आपल्याला वृक्ष लागवडीची सातत्याने गरज आहे आज जगाच्या पाठीवरती पर्यावरण संतुलनाचे मोठ्या प्रमाणात गरज असल्याने वृक्ष लागवड ही महत्त्वाची ठरत आहे. त्यासाठी आपण वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याने त्यासाठी माणसा मागे एक वृक्ष लागवड करणे हे ध्येय मनाशी बाळगून वृक्ष लागवड करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मा. सरपंच बाळासाहेब गोपाळे यांनी केले आहे.
निरोगी आयुष्यासाठी वनसंपदा महत्त्वाची असून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याबरोबरच वृक्ष संवर्धन ही महत्त्वाचे आहे. मानवी जीवनात पक्षांना अनन्यसाधारण महत्त्व असूनघर  व परिसर झाडांनी भरलेला राहण्यासाठी प्रयत्न करा असा बहुमोल सल्ला वनसंरक्षण सामाजिक वनीकरण विभाग पुणे चे रंगनाथ नाईकडे यांनी चिखलगाव (ता. खेड) येथे आयोजित कार्यक्रमात दिला.
चिखलगाव येथील ह.भ.प. वै. रखमाजी बाबा गोपाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावाच्या स्मशानभूमीमध्ये वड, पिंपळ, लिंब, औदुंबर यासह अन्य वृक्षांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे होते तर प्रमुख उपस्थिती मा. जिल्हा परिषद सदस्या सौ सुरेखा ताई मोहिते, मंगल चांभारे, सुजाता पचपिंड, संतोष गोपाळे, ज्ञानेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष मारुती धंद्रे, सखाराम खेगले, बाळासाहेब गोपाळे, सतीश चांभारे, लक्ष्मण मुके, तुळशिरम गोपाळे, माधव रणपिसे दत्तात्रय गारगोटे, विष्णू बच्चे, किसनराव गोपाळे, गुलाब मुके यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.