चला चला निवडणुक आली!नियोजन करण्याची वेळ झाली.

चला चला निवडणुक आली!नियोजन करण्याची वेळ झाली.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

कोरोनामुळे काही संस्थाच्या मुदत संपल्या होत्या तर काहीना मुदतवाढ भेटली तर काही संस्थावर प्रशासक नेमले होते.पण येत्या काळात या सर्वच संस्थाच्या निवडणुक तारखा जाहीर होण्याची चिन्हे आहेत यामध्ये जिल्हा परिषद,पंचायत समिती,पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती  बँक सहकारी बँक,नगरपरिषद या संस्थाच्या निवडणुकीच्या पुर्व नियोजनासाठी खेड तालुका राष्ट्रवादी काॅग्रेसने तातडीची बैठक आयोजित केली असून,आज शुक्रवार दि.२७ रोजी दुपारी ३ वाजता शिवछञपती सभागृह मार्केट यार्ड राजगुरूनगर येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अध्यक्षततेखाली ही बैठक पार पडणार असून,या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई सुखदेवतात्या पानसरे उपस्थित रहाणार आहेत.यासाठी सर्व राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे असे अहवान तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर,युवक अध्यक्ष कैलासराव लिंभोरे,महिला अध्यक्षा संध्याताई जाधव,युवती अध्यक्षा आशाताई तांबे व विद्यार्थी अध्यक्ष निलेश काळे यांनी केले आहे.