चाकण येथे महिला व बालकल्याण मंत्री मा.ॲड. यशोमतीताई ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळावा सपन्न.

चाकण येथे महिला व बालकल्याण मंत्री मा.ॲड. यशोमतीताई ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळावा सपन्न.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

चाकण येथे महिला व बालकल्याण मंत्री मा.ॲड. यशोमतीताई ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळावा पार पडला. मा. यशोमती ताई यांनी महिलांच्या अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन केले. तसेच सी.एस.आर फंडातून महिलांसाठी कामे करणारा असल्याचे सांगितले. देशाचे नेतृत्व एक महिला सुद्धा करू शकते असे त्यांनी देशाच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी व सोनियाजी गांधी यांचे नाव घेऊन महिलांना उदाहरण देऊन सांगीतले.महिला मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार. मा. संग्रामदादा थोपटे, आमदार मा संजयजी जगताप , मा. संध्याताई सव्वालाखे ( अध्यक्ष महिला काँग्रेस महा.राज्य ) मा.संगीताताई तिवारी ( उपाध्यक्ष महिला काँग्रेस महा.राज्य ) .
मा. किरणताई काळभोर (अध्यक्ष महिला काँग्रेस पुणे जिल्हा), मा.उत्कर्षाताई रुपवते ( सदस्य , महिला आयोग महा.राज्य )
मा. वंदनाताई सातपुते ( सरचिटणीस महिला काँग्रेस महा.राज्य ) , मा.महेश बाप्पु ढमढेरे ( खजिनदार पुणे जिल्हा काँग्रेस ) , संग्राम दादा मोहोळ ( उपाध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस) यांची उपस्थिती होती.
महिला मेळाव्याचे आयोजन खेड तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मा.गिताताई मांडेकर यांनी केले होते. प्रमुख मान्यवरांच्या ऊपस्थितीत अनेक महिलांना पद वाटप केले व अनेक महिलांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवा नेते कु. दिपक थिगळे व मा.निलेश कड यांनी मांडले . कार्यक्रमाचे नियाेजन पुणे जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष मा. चंद्रकांत गोरे ,मा.सतिष राक्षे ( मा.उपसभापती ) खेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.आमोलदादा दौंडकर , खेड युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड.गणेश सहाणे, चाकण शहर युवक अध्यक्ष मयुर आगरकर , सरचिटणीस धनेस म्हसे ,खेड किसान काँग्रेस अध्यक्ष मा.सुभाष होले, काँग्रेसच्या जेष्ठ नेते भास्करराव तुळवे व सुनिल मिंडे यांनी केले. अभार चाकण शहर काँग्रेस चे अध्यक्ष मा.बाळासाहेब गायकवाड यांनी मांडले.