चासकमान धरण परिसरात राज्यमार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा ठार.

  • चासकमान धरण परिसरात राज्यमार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा ठार.
    चासकमान धरण परिसरातील भिमाशंकर -शिरूर राज्य मार्गावर तनपुरे वस्तीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा ठार झाला असून,वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने येवून सदर अपघाताचा पंचनामा केला आहे.चासकमान धरण परिसरात डॅम ते बुरसेवाडी पर्यंत मोठे जंगल असून धरण व जंगलाच्या मधूनच शिरूर-भिमाशंकर राज्यमार्ग गेलेला आहे.राञीच्या वेळेस अनेक जंगली प्राणी धरणाच्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत असतात.अशातच त्यांना राज्यमार्ग ओलांडून जावे लागते.राञीच्या वेळेस या मार्गावरून वाहनांचा वेग दुप्पट असतो.यामुळे जंगली प्राण्यांचा हाकनाक बळी जातो.वनविभाग व प्रशासनाने राञीच्या वेळेस डॅम ते बुरसेवाडी पर्यंत वाहनांना ठरावीक वेगमर्यादा घालून दिली पाहीजे.या रस्त्यावर जंगली प्राण्यांचा वावर असे फलक लावल्यास वाहनचालक जागृत होवून वाहनांचा वेग कमी ठेवतील.