चासकमान धरण ९७% भरले!कधीही भिमानदीत पाण्याचा विसर्ग!नागरिकांना सावधनतेचा इशारा!

चासकमान धरण ९७% भरले!कधीही भिमानदीत पाण्याचा विसर्ग!नागरिकांना सावधनतेचा इशारा!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

*महत्वाची सूचना*
चासकमान धरण
दि.३/०८/ २०२१ सकाळी ६.०० वा. चासकमान धरण परिसरात पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे विद्युत गृहातून ५५० कुसेक्स ने विसर्ग कालव्यातून चालू आहे . आज रोजी धरण ९७.३२% भरले आहे तरी कोणत्याही वेळी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग भिमा नदी पात्रात सोडण्यात येईल त्यामुळे भिमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना या संदेशाद्धारे कळविण्यात येते की,नदी काठावर असणारे विदूयतपपं,शेतीचे अवजारे व इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, भिमा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
*तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे .*

(प्रेमनाथ शिंदे)
सहाय्यक अभियंता श्रेणी 1 चासकमान पाटबंधारे उपविभाग क्र. 5 राजगुरुनगर