चासकमान परिसरातील गावांना सुरळीत लसीकरण पुरवठा करावा- खेड तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष अरूण मुळुक यांची मागणी!

चासकमान परिसरातील गावांना सुरळीत लसीकरण पुरवठा करावा- खेड तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष अरूण मुळुक यांची मागणी!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

चास पंचक्रोशीतील चास ,आखरवाडी, मिरजेवाडी, बहिरवाडी ,पापळवाडी या गावांना आरोग्य उपकेंद्र मार्फत होणारा लस पुरवठा नियमित व मुबलक प्रमाणात व्हावा याकरिता आखरवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय दिलीपराव मोहिते पाटील व खेड तालुक्याचे मुख्य आरोग्य अधिकारी यांना पत्र देण्यात आले. आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांनी सदर ग्रामपंचायत पत्राची तात्काळ दखल घेऊन लस पुरवठा सुरळीत होण्याकरीता तालुका अधिकारी यांना तसे पत्र दिले आहे. यावेळी आखरवाडीच्या सरपंच मोनिकाताई मुळूक, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल अध्यक्ष ॲड अरुण मुळूक, उपसरपंच विठ्ठल मुळूक, ग्रामपंचायत सदस्य नीलमताई मुळूक, दत्तात्रय मुळूक, दिगंबर मुळूक, इत्यादी उपस्थित होते