चासकमान येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार!४४ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल!

चासकमान येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार!४४ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

चासकमान (ता खेड ) येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी ४४ वर्षीय व्यक्ती वरती खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कमान (ता.खेड ) येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे.पिडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान चासकमान (ता.खेड ) येथे हा प्रकार घडला. पिडित मुलीची आई घरात नसताना हा व्यक्ती घरात जाऊन पिडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देवुन इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार, आत्याच्यार करित असत. तीन वेळा बळजबरीने शाररिक संबध ठेवल्यामुळे पिडित मुलीला त्रास होऊन गरोदर राहिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.आरोपीला पोलिसांनी अटक केली असुन ७ दिवसाची न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षा राणी घाटे करित आहे.