चास आरोग्य उपकेंद्राचा परिसर झाला चकाचक!मा.सरपंच रितेश मुळुक पाटील व ग्रामपंचायत सदस्या निलम मुळुक यांचे योगदान.

चास आरोग्य उपकेंद्राचा परिसर झाला चकाचक!मा.सरपंच रितेश मुळुक पाटील व ग्रामपंचायत सदस्या निलम मुळुक यांचे योगदान.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

चास आरोग्य उपकेंदात कोव्हिड प्रतिबंधीत लसीकरण सुरू आहे.येथे चास व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिक लसिकरणासाठी येत असतात.आरोग्य उपकेंद्रासमोरच मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे एखादा जेष्ठ नागरिक पाय घसरून अपघात होण्याची परस्थिती निर्माण झाली होती.आखरवाडीचे माजी युवा सरपंच रितेश मुळुक पाटील यांच्या निदर्शनास ही समस्या लक्षात आल्यावर त्यांनी स्वखर्चाने येथे मुरूम टाकून भराव केला.आखरवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निलीमताई अमर मुळुक यांनी सुद्धा स्वखर्चाने मुरूम टाकला.ग्रामपंचायत सदस्य अविनाश मुळुक व शितल प्रविण मुळुक यांनी सुद्धा या कामासाठी योगदान दिले. आरोग्य उपकेंद्रासमोरील परिसर चकाचक झाला असून,लसीकरणासाठी येणार्‍या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.या वेळी माजी पंचायत समिती सदस्य बापुसाहेब घाटकर,उद्योजक सागरशेठ मुळूक पाटील,उद्योजक अशोकशेठ मुळूक पाटील,मोहकलचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबन तबाजी रणपिसे व ग्रामस्थ उपस्थित होते.