चास ता.खेड येथील सोमेश्वर मंदिराला एकदा भेट दयाच.

चास ता.खेड येथील सोमेश्वर मंदिराला एकदा भेट दयाच.
कृषी,निसर्ग,धार्मीक पर्यटन वाढीला लागावे म्हणुन स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे हे प्रयत्नशील होते.चास ता.खेड येथील सोमेश्वर मंदिर परिसराचा कायापालट व्हावा यासाठी उपतालुका प्रमुख संजय घनवट यांनी माजी स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांना सोमेश्वर मंदिर परिसराच्या विकासाची संकल्पना बोलून दाखवली.सुरेश गोरे यांनी शासनाकडून सोमेश्वर मंदिराच्या विकासासाठी ८० लक्ष निधी मंजूर केला.उपतालुका प्रमुख संजय घनवट यांनी स्वता लक्ष ठेवून येथील विकासकामे पुर्ण करून घेतली.चास येथील सोमेश्वर मंदिर एक उत्कृष्ट धार्मीक पर्यटन स्थळ म्हणुन नावारूपाला आले असून,पुणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रभरातून पर्यटक येथील मंदिराला भेट देण्यासाठी येवू लागले आहेत.