चुकुन खात्यात आलेले २० हजार रूपये केले परत!सौ.उषा सुभाष शिंदे यांचा प्रामाणिकपणा.

चुकुन खात्यात आलेले २० हजार रूपये केले परत!सौ.उषा सुभाष शिंदे यांचा प्रामाणिकपणा.
वाडा दि. ०२ प्रतिनिधी आदेश भोजने
तळेगाव दाभाडे येथे राहणारे सौ. उषा सुभाष शिंदे यांच्या बँक खात्यावर सुमारे वीस हजार रुपये रक्कम अचानकपणे जमा झाल्याने अचानक झालेली ही रक्कम पाहून त्या संभ्रमातपडल्या कारण स्वतः एक गृहिणी असून घरगुती मेस व्यवसाय चालवत आहेत. अचानक खात्यावर इतकी मोठी रक्कम आल्याने त्या संभ्रमात होत्या. बँक सुट्टी असल्यामुळे संबंधित खात्याची चौकशी करता येत नव्हती. गृहिणी असल्यामुळे त्यांना बँकेचे व्यवहारही तितकेसे येत नव्हते. त्यांनी त्यांचा मुलगा ओंकार यास सांगितले त्यानंतर त्यांनी ती रक्कम काढून आपले जवळ ठेवली ही रक्कम कोणाची आहे कुठून आली याबाबत त्यांनी शहानिशा चालू ठेवलीहोती.
त्यातच ज्या व्यक्तीचे पैसे खाते क्रमांक चुकीचा लिहिल्यामुळे उषा शिंदे यांच्या अकाउंटला जमा झाली होती. त्या व्यक्तीने उषा शिंदे यांचे फेसबुक वरून पत्रकार आदेश भोजने हे त्यांचे नातेवाईक असल्याची खात्री करून त्यांच नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर भोजने यांनी सदर प्रकार त्यांचा मुलगा ओमकार यास फोनवरून कळविले. तदनंतर ओमकार यांनी संबंधित व्यक्तीस फोन करून बॅंकेचे डिटेल्स मागवून घेऊन ही रक्कम त्यांचीच आहे. याची शहानिशा केल्यानंतर सदर रक्कम ही गणेश नायडू, रा. देहूरोड यांचीच असल्याची खात्री झाली नंतर त्यांना ती रक्कम त्याना देण्यात आली. कोरोनाच्या या नाजूक परिस्थिती गणेश नायडू यांचा पगार आला ही परंतु खाते क्रमांक चुकीचा गेल्यामुळे संबंधित पैसे हे चुकीच्या खात्यात जमा झाल्याने त्यांनी आता पैसे गेले पुन्हा मिळणार नाही या संभ्रमात होते पण माणुसकीचा पायंडा या कोरोना सदृश्य परिस्थिती ही सौ. उषा सुभाष शिंदे यांनी जपला. आलेले पैसे हे गणेश नायडू यांच्याशी त्यांचा मुलगा ओमकार यानी स्वतः संपर्क साधून त्यांना बोलावून खात्याचे तपशील तपासून ते पैसे त्यांचेच आहे. याची खातरजमा करून त्यांनी मोठ्या मनाने ते पैसे गणेश नायडू यांना सुपूर्द केले. गणेश नायडू यांनी पैसे मिळाल्यामुळे उषा शिंदे आणि त्यांचा मुलगा ओंकार, पत्रकार आदेश भोजने यांचे आभार मानले पैसे मिळाल्यामुळे गणेश नायडू यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता त्यांनी अजूनही कुठेतरी माणुसकी शिल्लक आहे असे बोलून समाधान व्यक्त केले .