जवाहर विदयालय चास येथे दहावी मार्च २०२० गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार.

जवाहर विदयालय चास येथे दहावी मार्च २०२० गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार.
चासकमान प्रतिनीधी

जवाहर विदयालय चास येथे दहावी २०२० गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी व विद्यार्थनिस उदयोजक गणेश लक्ष्मण टोके यांच्या हस्ते प्रत्येकी ५ हजार रूपयाचे बक्षिस देण्यात आले. प्रथम आलेल्या साई संतोष राऊत या विद्यार्थ्यास उदयोजक गणेश टोके यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले तर विद्यार्थिनीमध्ये प्रथम आलेल्या दिव्या गोरक्ष मुळुक हिस माजी सरपंच वस्कुल कमिटीचे सदस्य अनिल टोके यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
यावेळी मुख्याध्षापक व्हि.डी.निमसे,ग्रामस्थ डि डी ढमढेरे,संतोष राऊत,गोरक्ष मुळुक,कविता मुळुक.सौ.बागल मॅडम,सौ.राउत मॅडम,श्री जाधव सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन k.u गंभीर मॅडम यांनी केले.