जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या प्रयत्नामुळे पुणे जिल्ह्याला ३ हजार ५०० रेमडिसिव्हीर इंजेक्शन.

  • जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या प्रयत्नामुळे पुणे जिल्ह्याला ३ हजार ५०० रेमडिसिव्हीर इंजेक्शन.
    पुणे, 15 एप्रिल: राज्यातील शहरांप्रमाणेच पुण्यातील रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या (Remdesivir Injection )तुटवड्याची समस्या ऐरणीवर आली होती. मात्र आता काही काळासाठी पुण्यातील ही समस्या दूर झाल्याचं चिन्ह आहे. पुण्याला अखेर 3.5 हजार रेमडिसीव्हीर इंजेक्शन मिळालेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी थेट दिल्लीतून ही 3500 इंजेक्शन मागवून घेतली आहेत. एक्सपोर्ट स्टॉकमधील रेमडिसिव्हीर इंजेक्शन्स दिल्लीमध्ये शिल्लक होती, ती मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तिगत संबंध वापरून पुणेकरांना दिलासा दिल्याची माहिती मिळते आहे.