जि.परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी भोरगिरी परिसरातील नुकसानीची पहाणी करून पंचनामे करण्याचे आदेश.

जि.परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी भोरगिरी परिसरातील नुकसानीची पहाणी करून पंचनामे करण्याचे आदेश.
खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या वादळामुळे आमदार दिलीपशेठ मोहीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नुकसानीचा दौरा जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे व प्रांताधिकारी विक्रम चव्हाण यांनी करून नागरिकांना धीर दिला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायकशेठ घुमटकर ,मा.उपसभापती विठ्ठलशेठ वनघरे,जिल्हा परिषदेचे मा.सभापती अरुणशेठ चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महिला विभाग अध्यक्ष सुजाताताई पचपिंड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुखदेव तात्या पानसरे,किरण वाळुंज यांच्या उपस्थितीत हा दौरा करण्यात आला.
जिल्हा परीषद अध्यक्ष मा.निर्मलाताई पानसरे यांनी प्रांतसाहेब व तहसिलदार,सर्कल,तलाठी,ग्रामसेवक यांना तात्काळ पंचनामे करुण मदतीसाठी अवाहन केले तसेच त्यांना तात्पुरत्या या लोकांच्या सुरक्षीत स्थलांतरासाठी सुचना करणेत आल्या लवकरच पश्चिम भागातील लोकांची विस्कळीत झालेली घडी बसवण्यासाठी नक्कीच आमदार दिलीपशेठ मोहीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे जिल्हा परीषदेच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.