जुन्नरमधील शेतकरी कै.दशरथ केदारी यांच्या कुटुंबाची शरद पवार साहेब यांनी घेतली सांत्वनपर भेट!

जुन्नरमधील शेतकरी कै.दशरथ केदारी यांच्या कुटुंबाची शरद पवार साहेब यांनी घेतली सांत्वनपर भेट!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

जुन्नरमधील शेतकरी कै.दशरथ केदारी यांनी कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या केली होती. आज जुन्नर तालुक्यातील बनकर फाटा येथे त्यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काॅग्रेंस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची झळ आता जुन्नर सारख्या बागायती क्षेत्रालाही बसू लागली आहे. त्यामुळे केदारींसारखे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. ही घटना आपल्या सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना राज्य सरकारने योग्य ती मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे. शेतकरी हा लाखांचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान राखला पाहिजे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्वरित लक्ष देऊन प्राधान्यक्रमाने ते सोडवणे अपेक्षित आहे. अशी वेळ इतर शेतकऱ्यांना येऊ नये याची काळजी घ्यावी.असे मत पवार साहेब यांनी व्यक्त केले.