जुन्नरला पुढचा आमदार भाजपाचा असेल- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस!

जुन्नरला पुढचा आमदार भाजपाचा असेल- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस!

विशेष प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
पुणे जिल्ह्यात भाजपचा शिवसेनेला जोरदार झटका मानला जातो. आशाताई बुचके शक्तीप्रदर्शन करत पुण्याहून मुंबईला रवाना झाल्या होत्या. मुंबईत देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चद्रंकात पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपप्रवेश केला आहे. जवळपास १५ वर्ष त्यांनी शिवसेनेचं काम केलं होतं, मात्र २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जुन्नर तालुक्यात मोठा राजकीय बदल शिवसेनेने केला होता. महिलांचे मोठं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या आशा बुचके यांची शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली होती. आता त्या भाजपचा झेंडा हाती धरला आहे. आशाताई बुचके या वैष्णवधाम-बुचकेवाडी (ता. जुन्नर) येथील असून पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या आहेत. आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यावर आशाताई बुचके यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे नेतृत्वाची धुरा आली होती.

२०१४ मध्ये आशाताईंनी शिवसेनेकडून जुन्नर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र केवळ पाच हजार मतांच्या फरकाने त्यांना मनसेच्या शरद सोनावणेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २०१९ मध्ये मनसेचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आले आणि त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले. त्यानंतर बुचकेंनी अपक्ष निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती.
पक्षप्रवेशानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हटले की जुन्नर तालुक्याचा २०२४ ला आमदार भाजपाचा असेल.खेड व जुन्नर तालुक्यात भारतीय जनता पार्टीमध्ये येणार्‍यांची संख्या वाढली असून,यामुळे या तालुक्यात भाजपाला बळकटी मिळणार आहे.