टाटा हॅड्रिक्सन या कंपनीकडून कमान ता.खेड येथील अंगणवाडी मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप!

टाटा हॅड्रिक्सन या कंपनीकडून कमान ता.खेड येथील अंगणवाडी मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

टाटा हॅड्रिक्सन या कंपनीकडून कमान ता.खेड येथील अंगणवाडी मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
नववर्षाच्या आणि मकरसंक्रांती निमित्ताने अंगणवाडीतील मुलांना शालेय गणवेश, मास्क, पोषण आहार घेण्यासाठी प्लेट व चमचे याबरोबर गोड खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री आर.के.आय्यर,संतोष सांडभोर,देविदास सपाट, सरपंच योगेशराव नाईकरे,माजी उपसरपंच प्रविण नाईकरे,रामकृष्ण नाईकरे,नारायण नाईकरे,सोमनाथ सपाट,संदिप नाईकरे यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.