डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल,कडूस च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त पूरग्रस्थांना भरीव मदत.

डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल,कडूस च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त पूरग्रस्थांना भरीव मदत.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

ळडायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल,कडूस या शाळेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त शाळेकडून पूरग्रस्थांना कपडे व रोख रक्कम मदत हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन,राजगुरूनगर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.याप्रसंगी हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन,राजगुरूनगर च्या अध्यक्षा अॅड.सौ.मनीषा टाकळकर-पवळे ,उपाध्यक्ष अमर टाटीया,कार्याध्यक्ष दिलीपभाऊ होले,खजिनदार राहुल मलघे,संचालिका संगीता तनपुरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या व्यवस्थापिका सौ.जयश्री प्रतापराव गारगोटे यांनी केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रतापराव गारगोटे ,निलेश नेहेरे,प्रल्हाद गारगोटे,संजय गारगोटे,विलास गारगोटे,कैलास शेळके आदी संचालक व मुख्याध्यापक निखिल ढमाले उपस्थित होते. रविना प्रतापराव गारगोटे यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे सचिव व विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री.पंडित मोढवे यांनी आभार मानले.
डायनॅमिक इंग्लिश मेडियम स्कुल, कडूस यांसकडून शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त लहान मुलांसाठी 128 ड्रेस, 16 जीन्स, 20 शर्ट देण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रताप विष्णू गारगोटे व व्यवस्थापिका सौ.जयश्री प्रताप गारगोटे यांचेकडून 6 साड्या,2 ड्रेस व ₹5000/- ही मदत देण्यात आली.