डिंभे येथे हाॅटेलची तोडफोड करणार्‍या कोयता गँगच्या म्होरक्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक

डिंभे येथे हाॅटेलची तोडफोड करणार्‍या कोयता
गँगच्या म्होरक्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक

घोडेगाव प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

डिंभे(आंबेगाव) येथील एका हाॅटलेची ताेडफाेड करणा-या काेयतागँगच्या म्हाेरक्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. या प्रकरणात अद्याप काही संशयित आरोपींचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

गेल्या आठवड्यात डिंभे येथील हॉटेल सागर बार येथे कोयता गँगमधील पाच ते सहा जणांच्या टाेळक्याने उधारीवरुन दारु मागितली तसेच पैसे देखील मागितले. त्यास हाॅटेलमधील व्यवस्थापनाने नकार देताच टाेळक्याने हॉटेलची तोडफोड केली. त्यामुळे कोयता गँगची दहशत असल्याचे दाखवत धमकावुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला गेला अशी तक्रार घोडेगाव पोलीसांत नाेंदविण्यात आली.

कोयता गँगच्या म्होरक्या अशोक मदगे याला अटक केली असून,पुढील तपास सुरू आहे.